♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीकरांना भेडसावणारी पिवळ्या पाण्याची समस्या लवकरच दूर होणार – आ श्वेताताई महाले

  • MH 28 News Live, चिखली : मागील काही दिवसांपासून चिखली शहरातील नागरिकांना कडूळ व पिवळ्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे होत आहे याचे कारण विमानसात करून या गोष्टीला या समस्येची दखल घेऊन आमदार श्वेताताई महाले यांनी दिनांक दहा मे रोजी पेण टाकळी सिंचन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी आणि नगरपालिका पदाधिकारी अभियंत्यांसोबत तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली व लवकरात लवकर आवश्यक त्या दुरुस्त्यावर सुधारणा करून चिखली शहरातील नागरिकांना शुद्ध व सच्चा पाण्याचा नियमितपुरवठा करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना आमदार श्वेता ताई महाले यांनी दिले.

गेल्या महिन्यापासून चिखली शहरांमध्ये पिवळ्या व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नाराजीचे वातावरण होते आणि याबद्दल तक्रारी देखील वाढल्या होत्या. आ. श्वेताताई महाले यांनी या तक्रारींची व चिखलीकरांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत दि. १० मे रोजी पेण टाकळी सिंचन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली व नगरपालिकेचे अधिकारी व उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली.

हेडवर्कची जलवाहिनी व वाँल्वची दुरुस्ती करा – पालिका प्रशासनाला दिले निर्देश
या भेटीदरम्यान पेनटाकळी प्रकल्पाची पाहणे करून येथील प्रक्रियेची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी अभियंते व अधिकाऱ्यांकडून घेतली याशिवाय उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांशी व माजी नगरसेवकांशी देखील त्यांनी चर्चा केली. हा विषय नीट समजून घेतल्यानंतर पेनटाकळी प्रकल्पावरील हेडवर्कच्या जलवाहिनीचे तसेच वाँल्वच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्याचे निर्देश आ. महाले यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले. या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येऊन चिखलीकरांना लवकरात लवकर शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी दिले.

दरम्यान पेनटाकळी प्रकल्पावरील यंत्रसामुग्री तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येते दोन दिवसात सुरू असणार असल्यास सुरू राहणार असल्यामुळे चिखली शहराला आज व उद्या असे दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही अशी माहिती पालिका मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी दिली. त्यामुळे पुढील दोन दिवसात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन देखील मुख्याधिकारी कुरवाडे यांनी केले आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी नगराध्यक्ष विमलताई देव्हडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, सुभाषआप्पा झगडे, शैलेश बाहेती, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, विजय नाकवाल माजी नगरसेविका ममता बाहेती, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल साठे, शाम वाकदकर नगरपालिकेचे अभियंते पी. एस. भालेराव एन. पी. इंगळे, मेहकर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच चिखली नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129