काल रात्री घडलेल्या अपघातातातील ट्रँव्हल चालकावर गुन्हा दाखल, मृतांचा आकडा पोहचला दोनवर
MH 28 News Live, चिखली : काल दिनांक 9 मे रोजी खामगाव कडून चिखलीकडे येणाऱ्या ड्रायव्हर्स बसला पेट जवळील पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातामध्ये मृतांची संख्या आता दोन झाली असून सदर ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध अमरापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हकीकत अशाप्रकारे आहे की यातील नमूद आरोपींनी त्याचे ताब्यातील बाबा ट्रॅव्हल्स बस क्रमांक यूपी 78 fn 4662 ही भरदा वेगाने व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी पेठ गावाजवळील पैनगंगा नदीच्या पात्रात पलटी झाली त्यामध्ये लिलाबाई विष्णू गुट्टे वय 65 वर्ष व संगीता निवृत्ती ठाकरे व 41 वर्ष यांचे मरणास कारणीभूत झाला व इतर प्रवासी यांना जखमी करण्यास कारणीभूत ठरला आहे अशी तक्रार गजानन विष्णू बुट्टे वय ५५ वर्ष रा. वडशिंगी तालुका जळगाव जामोद यांनी अमडापूर पोलीसांकडे दाखल केली. यावरून गुन्हा नोंद झाला. ठाणेदार अमडापूर यांच्या आदेशाने एएसआय लक्ष्मण टेकाळे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. दरम्यान या अपघातात मयत झालेल्या महिलांची संख्या आता दोनवर पोहचली असून या मृत महिलांची नावे लिलाबाई विष्णू भुट्टे वय ६५ वर्ष रा. वडशिंगी ता. जळगाव जामोद व संगीता निवृत्ती ठाकरे व ४१ वर्ष रा. धापटी ता. खामगाव अशी आहेत. पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button