
केळवद ते धोडप मुख्य रस्त्याचे काम अखेर चालू
MH 28 News Live, किन्होळा : केळवद ते धोडप मुख्य रस्त्याचे काम अखेर चालू झाले असून आता तरी नागरिकांची खराब रस्त्यापासून मुक्तता होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान योग्य आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अशी मांगणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हा रस्ता चार ते पाच गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा बनला होता. इथे जिवित हानी होण्याची शक्यता गावकरी व्यक्त करत होते. परंतु, आज रोजी या रस्त्याचे काम सुरळीत सुरू असून हा रस्ता योग्य व दर्जेदार बनावा असे गावातील नागरिक म्हणत आहेत. संबंधित विभागांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन काम योग्य पद्धतीने व चांगला झाला पाहिजे अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी बोलून दाखवत आहेत.
तीन-चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते परंतु, रस्त्याचे काम कूचकामी व डांबरीकरण योग्य पद्धतीने न करता कमी खर्चात व दबाई मशीन रोलर कमी प्रमाणात केल्यामुळे थोडाफार डांबर टाकून थातूरमातूर करण्यात आले यामुळे गावकऱ्यांसाठी मुख्य रस्ता असलेला हा रस्ता तापदायक बनला होता.