♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पालकांसोबत देवदर्शनाला आलेल्या अल्पवयीन मुलीची हत्या… चिखली परिसरात खळबळ

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थानमधून काल, १२ मे रोजी राधिका विलास इंगळे नामक मुलगी ( ६ ) बेपत्ता झाली होती. या संदर्भात मुलीच्या पालकांनी अंढेरा पोलीसांकडे फिर्याद देखील नोंदवली होती. ठाणेदार गणेश हिवरकर यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र या दरम्यान आज राधिका ही मृतावस्थेत आढळल्याने अज्ञात व्यक्तीने मुलीची हत्या केल्याचे बोलले जात आहे. तपोवन देवी मंदिराच्या पाठीमागील भागात ५०० मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे चिखली परिसरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.


याबाबत थोडक्यात माहिती अशी की; विलास इंगळे ( रा. बाळापूर, जिल्हा – अकोला ) हे एका लग्नाच्या निमित्ताने चिखली येथे आले. असता काल ते तपोवनला गेले त्याच वेळी त्यांची मुलगी राधिका तिथून बेपत्ता झाली. सगळीकडे शोध घेऊनही राधिका सापडली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन अंढेरा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला. हरवलेल्या राधिकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. दरम्यान आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह मंदिराच्या मागील भागात आढळून आला. मुलीच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्ताचे घाव स्पष्टपणे दिसून आल्यामुळे राधिका हीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. तपोवन देवी परिसरात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वांना धक्का बसला असून या हत्येबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सदर घटनेचा अंढेरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129