♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

…पण कधीतरी मोठं व्हावच लागतं ना यार ..! श्री शिवाजी विद्यालयात २५ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे पार पडले स्नेहमिलन

MH 28 News Live, चिखली : ” शाळा आठवली की जुने दिवस डोळ्यासमोरून जातात. ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार… मित्र – मैत्रिणींनी सोबत केलेली धमाल सगळं आठवलं की टचकन डोळयातून पाणी येतं ! असं वाटतं लहान होतो तेच बर होत पण कधीतरी मोठं व्हावच लागतं ना यार ..! ” अशीच काहीशी मनस्थिती झाली होती श्री शिवाजी विद्यालयाच्या ‘ त्या ‘ माजी विद्यार्थ्यांची. निमित्त होतं तब्बल २५ वर्षानंतर आयोजित केलेल्या स्नेह मिलनाचं. १९९९ मध्ये श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेह मिलन दि. २८ मे रोजी अतिशय उत्साहात पार पडले. यावेळी जमलेल्या जुन्या मित्र मैत्रीणींना गतकाळातल्या आठवणींना गुरुजनांच्या साक्षीने उजाळा देत नवी ऊर्जा प्राप्त केली.


इतिहासात जाऊन शाळेचा एक दिवस जगता यावा अशी इच्छा प्रत्येकाची असते, हीच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय चिखली येथील १९९९ च्या दहावीच्या बॅचला असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी पुढे येत त्या संपूर्ण दिवसातील सुरुवातीपासून शेवटची घंटा वाजेपर्यंतचे क्षण परत एकदा २५ वर्षानंतर झालेल्या स्नेहमिलन सोहळ्याततून अनुभवले. इयत्ता दहावीचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने
बहुतांश मुले – मुली दाही दिशांना विखुरले. परंतु किशोर हिंगमीरे, रवी नागवे यांच्या पुढाकाराने तब्बल अडीच दशकांनी यशस्वीपणे स्नेहमिलन पार पडले. शाळेचे प्राचार्य नंदकिशोर गायकवाड सर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये वर्गशिक्षक मोहन गायकवाड सर, सुरुशे सर, सावळे सर, मगर सर उपस्थित होते. शिक्षक वृदांच्या हस्ते झालेल्या प्रतिमा पूजनाने स्नेहमिलनाचा शुभारंभ झाला. अध्यापकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाल, पुष्पगुच्छ व एक छोटीशी भेटवस्तू देऊन माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा यथोचित आदर सत्कार केला.

शिक्षकांनी केला हितोपदेश

सत्काराला उत्तर देताना वर्गशिक्षक मोहन गायकवाड यांनी पूर्वीच्या काळात व आता मोबाईलमुळे फार बदल झाला असून,आपल्या पाल्याना मैदानी खेळाची सवय लावा,मोबाईल वापराचा अतिरेक टाळा असे मत व्यक्त केले. तुमच्या काळात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी मार दिला तरी त्यांचे पालक तक्रार करत नव्हते. परंतु, आता तसे पाल्य आणि पालकही राहिले नाहीत अशी खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.
यानंतर सुरुशे सर यांनी ” ज्या क्षेत्रात आपण काम करित असाल तेथे प्रामाणिकपणे काम करा, जीवनात संस्कार व मार्गदर्शन आवश्यक आहे असे विचार मांडले. वर्गातील विद्यार्थी भानुदास रक्ताडे महाराज यांचीही त्यांनी स्तुती केली. सावळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात गेटटूगेदरच्या नियोजनाची स्तुती करून पुढील कार्यक्रम सहपरिवार ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली. आतापर्यंत मी शिकवलेले जवळपास १५० विद्यार्थी सेनादलात आहेत त्यामुळे निर्व्यसनी राहा, आरोग्याकडे लक्ष द्या, नियमित व्यायाम करा असाही सल्ला दिला. मगर सर यांनी शाळेचा उज्वल इतिहास सांगितला.अठरा पगड जातीचे विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करतात, याचा गर्व प्रत्येकाला असला पाहिजे. सगळ्या क्षेत्रात आपले येथील विद्यार्थी नाव गाजवीत असल्याचा अभिमान आहे. काही जुने विद्यार्थी आताही कुठे भेटले तर त्यावेळी आपल्याला शिक्षा व्हायची पण आपण ऐकत नव्हतो ऐकले असते तर आपलं आयुष्य चांगले असते याचीही खंत करतात. शिक्षणात एव्हडी ताकद आहे की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो.अशाप्रकारे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांनी केले. जीवनात शिस्त व वेळेला फार महत्व आहे, त्यामुळे आयुष्य सुखकर व आनंदी बनते आशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर हिंगमीरे तर आभार प्रदर्शन…… यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन किशोर हिंगमीरे, रवी उईके यांनी केले. यावेळी मिनल झोपे, लक्ष्मी रक्ताडे, रूपाली अनारकर, सुनीता पवार, मीरा कदम, दिपाली पडघान, नितीन पुजारी राजेंद्र सुभाष देवकर, रवी नागवे किशोर हिंगमिरे, शेख रशीद संतोष राऊत, निळकंठ मिसाळ, भानुदास रक्ताडे, प्रवीण वाडेकर, शरद कदम, संदीप कदम, विलास गोलांडे, अश्विन इंगळे, अजय टेहरे, राहुल मोरे, प्रशांत भंडारे, प्रमोद भगत आदी विद्यार्थी हजर होते. अल्पपहाराने कार्यक्रमाचा शेवट गोड झाला. अडीच दशकांपूर्वी एकाच फांदीवर किलबिलाट करणारे पक्षी अल्पशा सहवासानंतर पुन्हा एकदा आपल्याला घरट्यात परतले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129