♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वत: झाडू घेत केली बसस्थानक परिसराची साफसफाई… महिलांकरिता असलेल्या स्वच्छतागृह मात्र जैसे थे…

MH 28 News Live, चिखली : संबंध बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नांवारूपास आलेल्या शहरातील बसस्थानक परिसर विविध समस्यांनी ग्रासल्यामुळे बसस्थानक परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य वाढलेले होते. याठिकाणी असलेल्या प्लॅटफॉर्मसह विशेषकरून महिलांकरिता असलेल्या शौचालयात तर कमालीची घाण पसरल्यामुळे महिलांना याचा विशेष त्रास होतो. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एस. टी. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर विविध प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल एस.टी. प्रशासनाने घेत बसस्थानक परिसराच्या साफसफाईला सुरूवातही केली होती. मात्र दोन तीन दिवसांत जेमतेम परिसर साफसफाई झाल्याचे पाहून स्वत: आगार व्यवस्थापक विनोद इलामे यांनी दि. 28 मे रोजी हाती झाडू घेत परिसराची साफसफाईस सुरूवात केली. हे पाहून आगाराच्या अधिकार्‍यांसह महिला कर्मचार्‍यांनीदेखील परिसर स्वच्छ करण्यास सुरूवात केली. आगार व्यवस्थापकाच्या या प्रयत्नाचे प्रवाशांसह नागरिकांनी कौतुक केले असून अधिकार्‍याच्या मानसिकतेमुळे कुठलीही समस्या ही समस्या राहत नसल्याचा प्रत्यय चिखली बसस्थानकावरील नागरिकांसह प्रवाशाला यावेळी आला.

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणणारे संत गाडगे महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हाताच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. अगदी त्याच पद्धतीने आगार व्यवस्थापक विनोद इलामे यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत आगारातील समस्या सोडवण्याला प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे व त्यांच्या सहकार्‍यांनी बसस्थानक प्रशासनाला दि. 18 मे रोजी दिलेल्या निवेदनामध्ये बसस्थानकातील महिलांकरिता असलेल्या शौचालयाची सफाई करण्याबाबत विनंती केली होती, त्याकडे मात्र कानाडोळा करण्यात आला आहे. आजदेखील या महिला स्वच्छता गृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्यामुळे महिलांना स्वच्छता गृहामध्ये जाण्यास भीतीच वाटत आहे. बसस्थानकावर मिळणार्‍या सुविधा तोकड्या असल्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होत असून स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करणे आवश्यक झाले आहे. याठिकाणी लाईटची देखील व्यवस्था नसल्यामुळे रात्री अपरात्री महिलांना याठिकाणी जाण्यास भीती वाटत असल्यामुळे आया-बहिणींची आबाळ होत आहे. बसस्थानक परिसरातील या विविध समस्यांकडे बसस्थानक प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील स्वाभिमानीचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल वाकोडे यांनी दिला आहे. आगार व्यवस्थापक इलामे यांनी महिलाकरिता असलेल्या स्वच्छतागृह स्वच्छ करण्याच्या केवळ सूचना देवून वेळ मारून नेली असून उचित कार्यवाही न केल्यामुळे हे स्वच्छतागृह कायमच घाणीच्या साम्राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे एस.टी.प्रशासनाने महिलांकरिता असलेल्या समस्येकडे लक्ष न दिल्यास कडक आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

चिखली आगाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला अधिक बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न असून नियमितपणे आगाराची स्वच्छता करण्याचा आमचा मानस आहे. याकरिता माझे आगार सुंदर आगार ही मोहिम राबविण्याचा संकल्प घेतला असून यासाठी कर्मचार्‍यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. महिला स्वच्छतागृहा समस्येबाबत संबंधित संस्थेला याबाबत आवश्यक ते निर्देश आले असून वरिष्ठांना याबाबत कळविण्यात आले आहे.
– विनोद इलामे,

आगार व्यवस्थापक, बसस्थानक चिखली

जिल्ह्यातील मुख्य आर्थिक तसेच राजकीय, सामाजिक केंद्र असलेल्या या शहरातील बसस्थानकाची दुरावस्था पाहून अनेक नागरिकांनी आम्हाला याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे बसस्थानकावरील महिला स्वच्छतागृहाची समस्या ही महिलांसंदर्भात असल्यामुळे आम्ही आगार प्रशासनास निवेदन दिले आहे. आगार प्रशासनाने बसस्थानक परिसराची साफसफाई केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत मात्र मुख्य समस्या जैसे थे असल्यामुळे भविष्यात आम्हाला कडक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
– अनिल वाकोडे, जिल्हाउपाध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129