महसूलच्या भरारी पथकाचा घेतला अवैध वाळू तस्करांनी धसका; लोणारच्या तहसीलदारांची धडक कारवाई
MH 28 News Live, लोणार : विदर्भ तसेच मराठवाड्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांनी लोणार येथील महसूल पथकाचा धसका घेतल्याचे चित्र लोणार तालुक्यात दिसत असून या पथकामुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहे.
सध्या शासनाच्या धोरणानुसार वाळू लिलाव बंद आहे त्याचाच फायदा घेत विदर्भ व मराठवाड्यातील रेती माफिया अवैध वाळू वाहतूक करून ज्यादा भावाने विक्री करीत आहे या वाळू चोरीला अंकुश लावण्यासाठी तहसीलदार गिरीश जोशी यांनी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक तयार केले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अवैध येथे वाहतूकीला आळा बसला असून यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहना कडून बराच दंड वसूल केला आहे.
या पथकामध्ये प्रामुख्याने पथक प्रमुख नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, महसूल अधिकारी भगवानराव मुसळे, मंडळ अधिकारी विष्णू केंद्रे, तलाठी अशोक सौदर, एम आर खोडके, एस वाय इंगोले, संतोष पनाड. मंदार तनपुरे, किशोर मादनकर हे असून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्रभर गस्तीवर कर्तव्य बजावत आहेत. या पथकामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांचे मात्र धाबे दणाणले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button