♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोबाईलवरून महिलेला पाठवत होता अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; वर्ध्यातल्या युवकाची बुलढाणा सायबर सेलने पकडली गचांडी

MH 28 News Live / बुलढाणा : मोबाईलमुळे ज्या प्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडली त्याच प्रमाणात मानवी विकृती देखील बाहेर येऊ लागली आहे. यातून अनेक गुन्हे सुद्धा घडत आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला असून बुलढाणा सायबर सेलच्या पथकाने महिलेला मोबाईलवरून अश्लील मेसेजेस व व्हिडिओ पाठवणाऱ्या वर्धा येथील एका युवकाची गचांडी पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा शहरात राहणाऱ्या एका महिलेला वर्धा येथील रामनगर भागात येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाकडून मागील काही दिवसांपासून मोबाईलवर अश्लिल मेसेजेस, अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले जात होते. हा युवक अश्लील भाषेत संभाषण देखील सदर फिर्यादी महिलेसोबत करत होता. या संदर्भात संबंधित महिलेने बुलढाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बुलढाणा पोलिसांच्या सायबर सेलने मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचे WhatsApp law enforcement यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून प्राप्त आयपी ऍड्रेसचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपीचे नाव सुनील उत्तमराव शिंदे रा. रामनगर, वर्धा असे निष्पन्न झाले. या आरोपीचा वर्धा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. सुनील शिंदे यांच्याकडून अंदाजे ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी सायबर सेलचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पोलीस हवालदार रामेश्वर मुंडे, भारत जंगले, प्रशांत गावंडे, पोलीस अंमलदार केशव घुबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129