
वंचीत शेतक-यांच्या पिक विम्यासह त्रुटी पुर्तता केलेल्या तालुक्यातील चारशे शेतक-यांचा विमा अदा करा; स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांचा कृषी विभागात ठिय्या ;कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचीही केली मागणी.. शासनास सादर असलेल्या तफावत अहवालाची रक्कम अदा करण्याची केली मागणी
MH 28 News Live, चिखली : मागील आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर शासन आणि विमा कंपनी खडबडून जागी झाली. शेतक-यांच्या खात्यावर धडाधड कोट्यवधी रुपयांचा रखडलेला पिक विमा योजनेचा पैसा जमा झाला. मात्र आजही अनेक शेतकरी या पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.विमा कंपनी चे प्रतिनिधी शेतक-यांना अपात्र, तृटी आदी कारणे दाखऊन शेतक-यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार करित आहेत. अशी शेतक-याकडुन माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी तालुका कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांना आज दि.२० जुन रोजी धारेवर धरले. कृषी कार्यालयात आक्रमक पवित्रा घेत शेतक-यांसह चार तास ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील अंदाजे ५० हजार शेतक-यांनी ए. आय. सी. कंपनी च्या माध्यमातून पिक विमा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी. यासाठी वेळोवेळी आंदोलने केली.रविकांत तुपकरांच्या आक्रमक भूमिका आणि त्यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे शासन आणि पिक विमा कंपनी चांगलीच हादरली.आणि आज पर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ४४ हजार शेतकरी यांना दोनशे अठ्ठावीस कोटी सत्यांशी लाख रुपये विमा रक्कम शेतकरी यांच्या खात्यात जमा झाली आहे. अजुनही बरेच शेतकरी पिक विमा रक्कम मिळण्यापासून वंचित आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १४०० तर चिखली तालुक्यातील ४०० शेतकरी यांचे बॅक खात्याचे आय.एफ.एस.सी.कोड यांची चुकिची नोंद असणे.खाते क्रमांक चुकल्याच्या नावाखाली तृटी काढणे.विशेष म्हणजे दिड महिन्यापूर्वी विमा प्रतिनिधी यांनी तृटीची पूर्तता करुन,विमा कंपनीस शेतकरी यादी सह अहवाल पाठविला.तरी सुद्धा त्रृटीचा रक्कम अद्याप पर्यत शेतक-यांच्या खात्यावर आली नाही.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ११हजार शेतकरी अपात्र दाखविण्यात आले आहे.यामधे चिखली तालुक्यतील असंख्य शेतकरी आहेत.हा सारा कंपन्यांनी घोळ घातला आहे.
अनेक शेतकरी यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळाली.त्यांना उर्वरित विमा रक्कम म्हणजेच मंडळात जास्तीत जास्त विमा मिळाल्याची रक्कम ग्राह्य धरून, चिखली तालुक्यातील १९ हजार शेतकरी यांना,४ कोटी ७० लाख रुपये रक्कम कमी मिळाल्याचा अहवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केलेल्या मागणीनंतर डीसेंबर महिण्यात शासनास सादर केलेला आहे. तरीसुद्धा ती रक्कम देण्यासाठी शासन टाळाटाळ करित आहे.
या सर्व समस्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतक-यांसह तालुका कृषी अधिकारी चिखली कार्यालयात आज आंदोलन केले. शेतक-यांचा अंत न पाहता, येत्या चार दिवसांत उर्वरित शेतकरी यांचा पिक विम्याची रक्कम अदा करण्यात यावी. किवा पिक विमा कंपनी व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी विनायक सरनाईक यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.तर शेतक-यांच्या समस्या न सुटल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. यावेळी पत्रकार उध्दव थुट्टे, जिनेश वायकोस, दिलीप नरवाडे, औचितराव वाघमारे, गणेश वाघमारे, विजय ठेंग, संतोष माळवदे, गजानन ठेंग, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.