फ्लँट घेताय ? सावधान ! असे फसवतात काही बिल्डर; बुलढाण्यात उघडकीस आला प्रकार… बिल्डरवर गुन्हा दाखल
MH 28 News Live, बुलडाणा : शहरातील माळवीर परिसरात अपारमेंट मधील प्लॅटच्या नावाखाली बिल्डरने चक्क नागरिकांची एक नव्हे दोन नव्हे तर लाखो रूपयांनी फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्या बिल्डर आरोपीविरूद्ध शहर पोलिस स्टेशन येथे दि. १२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारकर्ता रवि भास्कर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१७ मध्ये रवी जाधव यांनी आरोपी यांच्या कडून माळविहीर शिवारात गट क्र २३३ प्लॉट नं २० ते २३ मधील रॉयल अपारमेंट २ मध्ये प्लॅट क्र २०१ क्षेत्रफळ ८०.६६ चौ.मी.टू. बीएच के अँग्रीमेंट करून १७ लाख ५० हजार रूपयामध्ये दि १० जुलै २०१७ रोजी घेतला होता. व टोकन अमाउंट म्हणून आरोपी शेख अहेमद शेख मेहबुब शेख काशीद अहेमद, राजेंद्र जगताप यांना ५० हजार रूपयांचा चेक दिला होता. व १ लाख रूपये नगदी ९ जुलै रोजी दिले होते. त्यानंतर नॅशनल बिल्डर यांचे कडून सदर प्लॅट चा विक्री करार करून डिएचएफएल बँक बुलडाणा सदर प्लॅट तारण देवून त्यांचे कडून १४ लाख ८० हजार रूपये गृह कर्ज घेतले होते. ते मंजूर झाल्यानंतर डि एच एप एल बँक – बुलडाणा यांनी आरोपी यांचे नावाने दि १८ जुलै २०१७ रोजी १२ लाख १५ हजार रूपयाचा चेक दिला. त्यानंतर आरोपी यांनी करारनाम्यानुसार उल्लेख केल्याप्रमाणे खाली पार्कींग, पाण्याचे आरओ, हॉल पीओपी, बिल्डीर हाय स्पीड लीफट पावर बँक अपसह मध्ये दप्लॅब मध्ये इन्वरटरव संपूर्ण इंटरकॉम एरिया मध्ये सिसीटीव्ही कॅमेरा त्यानंतर २४/७ सुरक्षा रक्षक सर्व सुविधा इमारत हस्तातरण केल्यानंतर एक वर्षांपर्यंत बिल्डरचे खर्चाने करण्याचे ठरविले होते. आरोपी यांनी करारनाम्याप्रमाणे बिल्डींगचे व प्लॅटचे काम पुर्ण केले नाही.
यासंदर्भात फिर्यादी रवी जाधव यांनी आरोपी यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की प्लॅटचे हप्ते व घराचा लोनचा हप्ता चालू असल्याचे आरोपी यास सांगितले तेंव्हा ” तुमचे प्लॅटचे बाकी असलेले काम तुम्हीच पुर्ण करा व येणारा खर्च हा हिशोबामध्ये करून घेऊ ” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाईलाजाने जाधव यांनी प्लॅटचे काम करण्यात आले व त्याला खर्च ४ लाख १० हजार रूपये आला.
पुढे आरोपी यांची दादागिरी वाढत गेली. प्लॅटची खरेदी करून द्या अशी मागणी रवी जाधव यांनी केली असती ” तुमचे कडील बाकी असलेले पैसे द्या तेव्हा तुमचे प्लॅटची खरेदी करून देतो ” असे उत्तर देऊन आरोपीने कराराचा भंग केला. आजपर्यंत आरोपीने खरेदी करून दिलेली नाही असे तक्रारकर्ता यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. माझ्या प्लॅटचे बिल्डींगचे काम सुद्धा पुर्ण केले नाही व माझी १७ लाख ५० हजार रूपयांनी पसवणूक केली आहे. तसेच माझीच नाही तर इतर लोकांची सुद्धा त्यांनी फसवणूक केली आहे. बिल्डींग मध्ये राहणारे स्वप्नील मधुकर ठाकुर यांची ८ लाख ५० हजार, सुनिल रंगनाथ जपे यांची ९ लाख ४० हजार, शरद कडुबा पवार यांची १३ लाख १० हजार, प्रकाश बाहेकर ६ लाख ३० हजार, सचीन कोष्टी यांची १३ लाख ५० हजार, विशाल बनकर ८ लाख ५० हजार, संतोष खरात यांची ७ लाख ३० हजार रूपये अशी आमची सर्वांची मिळून ८४ लाख १० हजार रूपयांनी फसवणूक केली असल्याचे रवी जाधव यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
आरोपी यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी प्लॉट क्र २० ते २३ गट क्र २३३ इमारात एका बँकेला तारण देवून २ कोटी रूपयांचे प्रकल्प कर्ज घेतले आहे व इमारतीचे व प्लॉट चे काम पूर्ण न करून करारनाम्यानुसार सोयसुविधा दिलेल्या नाहीत व प्लॉटधारकांना सोसायटी सुध्दा तयार करून दिली नाही व इमारतीचा सातबारा सोयायटी चे नावाने करून देवून कन्वेडीड केले नाही. सदर रॉयल अपारमेंट २ बिल्डींग व आमचे प्लॅट आम्हाला कोणतीही पुर्ण कल्पना न देता एका बँकेकडून २ कोटी रूपये कर्ज घेतले. याप्रकारणातील आरोपी शेख अहेमद शेख मेहबुब शेख काशीद अहेमद, रा जामा मज्जीद जवळ इकबाल चौक व राजेंद्र जगताप, राजीक अन्सारी रा. बुलडाणा यांनी अपारमेंट मधील धाराकांची ८४ लाख १० हजार रूपयांने फसवणूक केली आहे. व मोपा कायद्याचे उल्लंघन केले आहे असे तक्रार कर्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी यांच्या विरूद्ध शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहे. सदर घटनेचे पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय नागरे करीत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button