♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डेंग्यूला चिखली शहरात नो एंट्री…! मुख्याधिकारी डॉ कुरवाडे यांच्या मार्गदर्शनात न. प. प्रशासन लागले कामाला

MH 28 News Live, चिखली : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात डेंग्यूने हाहाकार माजवल्यामुळे लगतच्या भखनखेड येथे दोन बालकं आणि एका विवाहितेचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यूचा फैलाव होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन सजग झाले आहे. शहरामध्ये डेंग्यू साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वतोपरी नगर पालिकेचा आरोग्य विभाग कंबर कसून तयार आहे. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना शहरात राबवणे सुरू झाले असून नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेऊन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी केले आहे.

तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव चिखली शहरात होऊ नये यासाठी शहरात फवारणी सुरू केली आहे. आज पुंडलिकनगर, गजानननगर भागामध्ये मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी जातीने हजर राहून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वॉलमनची बैठक चिखली शहराला आज आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी व पाणी व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्याकरिता नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी वॉल मनची तातडीची मीटिंग बोलावली. त्यांच्या समस्या जाणून घेत शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश कुरवाडे यांनी दिले.

मान्सूनपूर्व नालेसफाईचे निर्देश

मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिल्या असून, कामचुकारपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. पावसाळ्यात नाल्यांमध्ये घाण व कचरा अडकून नाल्या चोकअप होतात. परिणामी नालीतील पाणी रस्त्यावर वाहते व काही ठिकाणी दुकानांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात वित्त हानी होते. हे प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या साफसफाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली. सफाई कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करून कामचुकारपणा करणाऱ्या सफाई कामगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील राहिलेल्या नाल्या साफसफाई करण्यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचे कुरवाडे यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

नगर पालिका हद्दीतील भागात डेंग्यू साथरोगाची लागण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिकांनीदेखील न.प. प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या घरात पाण्याचा साठा करू नये, कुलरमधील पाणी बदलत राहावे, एक दिवस कोरडा दिवस म्हणून नागरिकांनी पाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना केले.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वॉलमनची बैठक चिखली शहराला आज आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी व पाणी व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्याकरिता नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी वॉल मनची तातडीची मीटिंग बोलावली. त्यांच्या समस्या जाणून घेत शहरातील नागरिकांना लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश मुख्याधिकारी कुरवाडे यांनी दिले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129