♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत आ. श्वेताताई महाले यांनी घेतली अपघातातस्थळी धाव; मदतकार्याची पाहाणी करून घेतली जखमींची भेट

MH 28 News Live, चिखली : समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ पिंपळखुटा या गावानजीक काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये २५ जण होरपळून मृत्यूमुखी पडले. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी व मदत कार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. श्वेताताई महाले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली.


काल रात्री समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लक्झरी बसला लागलेल्या आगीमध्ये २५ जणांचा हुरपळून मृत्यू झाला; या अपघाताचे वृत्त कळताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि मदत कार्य वेगात सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन ताबडतोब घटनास्थळाकडे धाव घेतली. राज्य सरकारच्या वतीने या भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. देऊळगाव राजा येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आ. श्वेताताई महाले व अन्य लोकप्रतिनिधींनी अपघातस्थळाची पाहाणी करून जखमींच्या मदत कार्याबद्दल चौकशी केली, थेट रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेटायला घेतली आणि त्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी रुग्णांना आवश्यक पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. श्वेताताई महाले यांनी अपघातातील मृतांना श्रध्दांजली अर्पण केली.

संवेदनशील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आ. महाले यांनी मानले आभार

या भयंकर अपघाताची भीषणता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन जखमींची चौकशी करत मदतकार्याला गती दिली. एवढेच नव्हे तर अपघातात जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, ही बाब राज्य सरकारची संवेदनशीलता दाखवणारी असल्याची प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली आणि या संवेदनशील कार्यपद्धतीबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129