♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बस अपघातातातील २५ मयतांवर बुलढाण्यात झाले सामुहिक अंत्यसंस्कार, आ. श्वेताताई महाले यांनी दिला अखेरचा निरोप

MH 28 News Live, चिखली : परवाच्या ह्रदयद्रावक बस अपघातातील २५ मयतांवर बुलढाणा येथे दि. २ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. डबडबल्या डोळ्यातून येणार्‍या आसवांनी प्रत्येकाच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली . शिंदे – फडणवीस सरकार मधील कर्तव्यदक्ष मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आ. श्वेताताई महाले व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या प्रसंगी आपल्या शोक संवेदना प्रकट करण्यासाठी उपस्थित होते. मृतकांना अखेरचा निरोप दिला. पुन्हा एकदा धगधगत्या अग्निज्वालांत हे मृतक पंचतत्वात विलीन झाले.


सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या पिंपळखुटानजीक समृद्धी महामार्गावर दि. १ जून च्या पहाटे उत्तररात्री खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. यापैकी २४ प्रवाशांच्या मृतदेहांवर आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूरच्या गुडिया शेख या तरुणीचा मुस्लिम कब्रस्थानात सायंकाळी दफनविधी करण्यात आला .जळून कोळसा झालेल्या आप्तजनांत आपले नेमके कोण हे ओळखताही येईना, अशा दुर्देवी प्रसंगात सामूहिक अंत्यसंस्कारावेळी सर्व प्रवाशांच्या कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला होता. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः सरण रचून अंत्यविधी पार पाडले. कालपासून ना. महाजन हे बुलढाण्यातच मुक्कामी असून, सर्व परिस्थिती ते योग्यरितीने हाताळत आहेत.


परवाच्या अपघातातील २५ मृतदेहांपैकी २४ जणांवर अंत्यसंस्कार पार पडले. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवलेल्या मृतदेहांना वेगवेगळ्या ५ स्वर्ग रथांद्वारे हिंदूस्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. जवळपास दोन तास इतका वेळ अंत्यसंस्कारसाठी लागला.


श्वेताताईंनी व्यक्त केल्या शोक संवेदना
आ. श्वेताताई महाले यांनी या अपघातातील मयतांना श्रध्दांजली अर्पण केली. कालच्या त्या भयावह अपघाताच्या दुःखद आठवणी बुलढाणा जिल्ह्यातील जनता आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या आयुष्यातील या अतिव दुःखद प्रसंगी मी देखील जातीने उपस्थित होते. चिखली मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींच्या वतीने मी पानावलेल्या डोळ्यांनी आणि हुंदके सावरात या मयतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्वशक्तिमान परमेश्वराला हीच प्रार्थना केली की, देवा असे दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ देऊ नको ! असा दुर्धर प्रसंग कोणाच्याही आयुष्यामध्ये घडू देऊ नको !! असे भावोद्गार आ. श्वेताताई महाले यांनी काढले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला गती देत जखमींची विचारपूस केल्यामुळे राज्य सरकारने ही दुर्घटना अतिशय गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होते असे आ. महाले म्हणाल्या. हा अपघात घडल्यापासून ते आज दुपारी अंत्यसंस्कार होईपर्यंत जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, महसूल विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी जे अथक परिश्रम घेतले ते खरोखरच वाखाण्याजोगे आहेत. प्रशासनाच्या यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही कार्यतत्परता सरकारच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंबच म्हणावे लागेल अशा शब्दात शासकीय यंत्रणेच्या कार्याची दखल त्यांनी घेतली. सर्व मृत प्रवाशांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी करबध्द प्रार्थना करत आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129