♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खळबळजनक…! भररस्त्यात हात पकडून त्याला तिघांनी जखडले. लोणारमध्ये पोटात चाकू भोसकून युवकाचा खून; जुन्या भांडणाचा वाद उफाळला…

MH 28 News Live, लोणार (राहुल सरदार) : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत तीन जणांनी एका युवकाला मारहाण करत त्याच्या पोटात चाकू भोकसल्याची घटना लोणार येथे शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग लगत बायपास रोडवरील दत्त मंदिराच्या बाजूला असलेल्या हॉटेल तेजस वाईनबार समोर दि. ९ जुलै २०२३ रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मृतक रितेश सुनील मापारी ( २२ ) रा. खटकेश्वर नगर, लोणार हा लोणार येथील तेजस वाईन बार व रेस्टॉरंट येथे जेवनाकरता गेला असताआरोपी शुभम नारायण मापारी उदय विनोद सातपुते व शुभम उर्फ विशाल भारस्कर यांनी मृतकासोबत जुन्या भांडणाचा वाद उकरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मृतक रितेश सुनील मापारी याने विनाकारण शिवीगाळ करू नको असे म्हटले. मात्र तीन आरोपींनी मृतकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी रितेशचे दोन्ही हात पकडून ठेवले यावेळी आरोपी शुभम उर्फ विशाल भारस्कर यांनी त्याच्या हातातील चाकूने मृतक रितेश मापारी यांच्या पोटात वार केला.
जखमी रितेशला नागरिकांनी खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मेहकर येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला मेहेकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी रितेश ला तपासले असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक लेखनिक गजानन सानप यांना मिळतात त्यांनी या गंभीर घटनेची माहिती होणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाला अलर्ट मोड वर राहण्याचे आदेश दिले.

मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध कलम 302 504/34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य बघता मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करत आरोपीच्या मागावर पाठवले. या या पथकामध्ये ना पोका संतोष चव्हाण ना पो का संजय जाधव पो का गणेश लोढे पो का गजानन डोईफोडे. पो का अनिल शिंदे यांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या व तिन्ही आरोपींना अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे लेखनिक पो का गजानन सानप पो का विशाल धोंडगे हे करीत आहेत

लोणारकर म्हणतात…

सध्या लोणार शहरामध्ये जागोजागी युवक वर्गाचे ग्रुप तयार झालेले दिसून येत आहेत. यामध्ये किरकोळ जरी वाद झाले तरी असले प्रकार घडून येत आहेत. मागील पंधरा दिवसा अगोदरही असाच चाकू हल्ला झाला होता मात्र सुदैवाने त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. असे वाद पुन्हा होऊ नये यासाठी पालकांनीही आपल्या मुलाकडे लक्ष देणे गरजेचे असून अशा वादग्रस्त ग्रुपकडे नवनियुक्त पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी जातीने लक्ष देत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण करणाऱ्या शहराची शांतता भंग करणाऱ्या अशा ग्रुप वर कडक कारवाई करावी व अशा होणाऱ्या घटनेला आळा घालत कायम बंदोबस्त करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129