♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गांधी जयंती विशेष – कधी आणि कसे अवतरले बापू नोटांवर; जाणून घ्या थोडक्यात इतिहास

MH 28 News Live : हसतमुख चेहरा भारतीय रुपयाची ओळख आहे. पण भारतीय चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कधी आणि कसा आला ? हा फोटो कुठला आहे आणि तो कोणी काढला? असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील. आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर ४९ वर्षांपर्यंत महात्मा गांधींचा फोटो भारतीय चलनावर कायमस्वरुपी छापला जात नव्हता. पूर्वी नोटांवर अशोक स्तंभ असायचा.

१९५० मध्ये सरकारने २, ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटांवरही अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला होता. पुढील काही वर्षे अशोक स्तंभासह भारतीय रुपयावर वेगवेगळी चित्रे छापली जात होती. ज्यामध्ये आर्यभट्ट उपग्रह, कोणार्क सूर्य मंदिर आणि शेतकरी अशी चित्रे असत.

 

१९६९ साली पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आला. त्यावर्षी महात्मा गांधींची 100 वी जयंती होती आणि त्यानिमित्ताने नोटांची एक विशेष मालिका बाजारात आणली होती. या सीरिजमधील नोटांवर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा फोटो छापण्यात आला होता. १९८७ मध्ये दुसऱ्यांदा ५०० रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

१९९६ मध्ये भारतीय रिझर्व बँकेने फोटोला कायमस्वरूपी स्थान दिले १९९६ मध्ये रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कायमस्वरुपी छापण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. सरकारच्या मान्यतेनंतर १९९६ मध्ये अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा छापल्या जाऊ लागल्या. त्यानंतरही नोटांवरुन अशोकस्तंभ पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला नाही. डाव्या बाजूला लहान आकारात छापला जातो. २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या फोटोसह नोटांची नवीन मालिका सुरू केली. नोटेवर महात्मा गांधींच्या चित्रासोबत ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगोही छापण्यात आला.

भारतीय नोटांवर दिसणारा महात्मा गांधींचा फोटो व्यंगचित्र किंवा चित्रण नसून मूळ फोटोचा कट आहे. हा फोटो १९४६ मध्ये कोलकाता येथील व्हाइसरॉयच्या घरात काढण्यात आला होता. तेव्हा महात्मा गांधी ब्रिटिश नेते लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. त्यांचा हा फोटो त्यावेळी काढण्यात आला होता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129