
” जिल्ह्यातील नागरिकांना परिवर्तन हवंय, विकास हवाय. आता जनता भूलथापांना बळी पडणार नाही ” ‘ वन बुलढाणा मिशन ‘ अंतर्गत जाहीरनामा जनतेचा’ कार्यक्रमात संदीप शेळकेंनी व्यक्त केली जनभावना…
MH 28 News Live, शेगाव : जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी व समग्र विकास साधण्यासाठी नागरिकांना परिवर्तन हवंय, विकास हवाय. आता जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे परखड विचार राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केले.
वन बुलढाणा मिशनच्या ‘जाहीरनामा जनतेचा’ कार्यक्रमांतर्गत शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे ५ ऑक्टोबर रोजी संवाद सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिक, माता- भगिनी, युवक, बालगोपालांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना शेळके म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष बाकी आहे. बेरोजगारीची समस्या मोठी आहे. सिंचनाशिवाय शेतीला अर्थ नाही. शेतकरी सुखी झाला तर शेतमजूर सुखी होईल. मला शेतकऱ्यांच्या बांधावर सिंचन पोहचवायचे आहे, असे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. जनता जनार्दनाने अनेकांना संधी दिल्या. फायदा काय झाला ? काहीच नाही. लोकप्रतिनिधींनी भ्रमनिरास केला. साध्या- साध्या प्रश्नांवर सुद्धा कामं केली नाही. त्यामुळे विकासात जिल्हा पिछाडला. जिल्हयात मोठे उद्योग नाहीत. उद्योग आले तर युवकांना काम मिळेल. हाताला कामे मिळाली तर युवक स्वावलंबी होतील. येणाऱ्या काळात जनतेने एकच गोष्ट करायचीय. आपण नेत्याच्या वजनाखाली नाही तर नेत्यावर आपले वजन ठेवायचंय. तेंव्हाच विकास शक्य होईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील जनतेने एकदा संधी द्यावी. त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, असे आश्वासन त्यांनी दिले. सभेला ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेअंतर्गत टाकळी विरो येथील ही दुसरी सभा होती. पहिली सभा ईसोली(ता. चिखली) येथे झाली. तेथील ग्रामस्थांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाकळी विरो येथेही अभूतपूर्व प्रेम मिळाले.