♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. श्वेताताई महाले यांचा ” आमदार आपल्या दारी ” पॅटर्न बदलवतोय जनसामान्यांचे जीवन ▪️ शासकीय योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत ▪️ दलालांच्या कमिशनखोरीला चाप

चिखली : राज्यातील कायदेमंडळाचे एक सभागृह असलेल्या विधानसभेचे आमदार हे त्या त्या मतदारसंघातील लक्षावधी लोक व शासन यांच्यातील दुवा असतात. याशिवाय आपल्या मतदारांच्या आशा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याचे व शासकीय योजनांचे लाभ थेट मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उन्नत करण्याचे कार्य देखील या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असते. या कसोटीवर आ. श्वेताताई महाले ह्या पूर्णपणे खऱ्या उतरत असून आपल्या चिखली मतदारसंघात त्यांनी जनसेवेचा आगळावेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. ” आमदार आपल्या दारी ” हा पॅटर्न इतर आमदारांसाठी सुद्धा अनुकरणीय असून आ. महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयोग चिखली मतदारसंघातील जनसामान्यांचे जीवन बदलवून टाकणारा ठरत आहे.


जनसेवेचा वसा घेऊन सन २०१४ मध्ये राजकारणात आलेल्या श्वेताताई महाले यांनी सुरुवातीपासूनच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत जनतेशी नाळ जोडली. याचेच फलित म्हणून जिल्हा परिषदे महिला व बालकल्याण सभापती आणि २०१९ मध्ये त्या आमदार झाल्या. वेगवेगळ्या जाती-धर्माच्या व विविध वर्गातल्या मतदारांनी आपल्याला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची दिलेली संधी आ. श्वेताताई महाले या विसरल्या नाहीत. जनतेप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी अधिक जोमाने प्रयत्न चालू ठेवले. एकीकडे मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणत मूलभूत नागरी सुविधा पुरवत तसेच विविध प्रलंबित मार्गे कामे लावत त्यांनी एक विकासाचे एक नवे पर्व सुरू केले तर दुसरीकडे शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य देखील आ. महाले यांनी हाती घेतले. ” आमदार आपल्या दारी ” ह्या उपक्रमाद्वारे सेवालालय ह्या आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामदूतांच्या मार्फत मतदारसंघातील लक्षावधी लोकांना शासकीय योजनांचे लाभ थेटपणे मिळवून देण्याचा त्यांचा हा अभिनव पॅटर्न सर्वसामान्य लोकांसाठी कमालीचा फायदेशीर ठरत आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये बोकाळलेल्या दलालांना देखील यामुळे चाप बसला असून शासकीय यंत्रणा देखील झाडून कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळते.

या योजनांचे मिळतात लाभ

” आमदार आपल्या दारी ” या संकल्पनेतून चिखली मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, बांधकाम कामगार, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, दिव्यांग, वृद्ध, निराधार अशा विविध समाज घटकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यामध्ये नवीन मतदार ओळखपत्र, बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी तसेच नूतनीकरण व दावे, नवीन शिधापत्रिका तसेच नावे वगळणे व समाविष्ट करणे, आयुष्यमान भारत कार्ड ( ५ लाख रुपयांपर्यंतच्या मदतीसाठी ), माता बाल संगोपन योजना, प्रधानमंत्री किसान योजनेचे केवायसी, शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनासाठी दरवर्षी द्यावे लागणारे जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला, नापिकी व अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्रुटी व केवायसी, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, उज्वला गॅस योजना, महाज्योती अंतर्गत शिलाई मशीनचे वितरण व प्रशिक्षण, वृद्ध कलावंतांना मानधन योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत शस्त्रक्रियांसाठी व वैद्यकीय कारणांसाठी केली जाणारी आर्थिक मदत, नियोजित विश्वकर्मा योजना, आभा कार्ड ( २ लाख रुपयांपर्यंतच्या मदतीसाठी ),
स्वावलंबन योजना, ई श्रम कार्ड, आरोग्य विषयक सुविधा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, नैसर्गिक आपत्तीसाठीची मदत अशा विविध कल्याणकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांचे फायदे चिखली शहरासह मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मिळत असून या निमित्ताने आ. श्वेताताई महाले यांचा नित्य जनसंपर्क व अखंड लोकसेवा सुरू आहे.

अशी होते अंमलबजावणी

आ. श्वेताताई महाले यांच्या ” आमदार आपल्या दारी ” या अभिनव पॅटर्नमधून शासकीय योजनांच्या लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाते. कार्यालयीन कर्मचारी व ग्रामदूत असे मिळून जवळपास ५० जण या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. ग्रामदुतांमार्फत मतदारसंघात गावोगावी व घरोघरी शासकीय योजनांची माहिती पुरवली जाते, पात्र कागदपत्रे भरून घेतली जातात व ती फाईल संबंधित विभागाच्या कार्यालयात सादर करून त्यांचे लाभ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात. बरेचदा विविध प्रमाणपत्रे किंवा लाभाचे एखाद्या कार्यक्रमांमधून वितरण केले जाते. आ. श्वेताताई महाले यांचे या संपूर्ण अंमलबजावणीवर बारीक लक्ष असते. यामध्ये असलेल्या लहान मोठ्या उणीवा त्या ताबडतोबिने दूर करतात व वेळप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करून आलेल्या अडीअडचणी देखील सोडवतात.

अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा – आ. श्वेताताई महाले

” जनसेवा हीच ईश्वरसेवा ” हे ब्रीद प्रमाण मानून लोकप्रतिनिधित्वाचे कार्य करताना जनतेच्या अपेक्षा व आशा – आकांक्षा पूर्ण करणे हे मी माझे कर्तव्य समजते असे प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली. जनतेने दिलेले आमदार हे पद जनतेच्या हितासाठी उपयोगात आणणे हीच यामागे भावना असल्याचे त्या म्हणाल्या. ” आमदार आपल्या दारी ” या उपक्रमातून जास्तीत जास्त लोकांनी शासकीय योजनांच्या लाभ घ्यावा या संदर्भात काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी किंवा ८६९८४४३२०१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघातील सर्व नागरिकांना केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129