♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत इथे सूरु आहे अवैध दारू विक्री, मनसेने केली बंद करण्याची मागणी

MH 28 News Live, चिखली : शहरातील राजे संभाजीनगर परिसरात अवैधरीत्या बेकायदेशीरपणे खुलेआम दारू विक्री सुरू असून तरुणांसह लहान मुले सुद्धा दारूच्या आहारी जात आहे. याच दारू पायी अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले असून परिसरात दारूमुळे भांडणे व मारामाऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी मनसेचे संभाजीनगर विभागअध्यक्ष बंटी कळमकर यांचे नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.

अवैध दारू विक्री करणाऱ्यांना वारंवार तोंडी सांगूनही त्यांचेवर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. आम्ही हप्ते देऊन दारू विक्री करतो त्यामुळे आम्हाला कोणाचीही भीती नसल्याचे दारू विक्रेते खुलेआमपणे सांगतात. जाफराबाद रोडच्या बाजूलाच शिकवणी वर्गाचे क्लासेस सुरू असून त्या ठिकाणी लहान, तरुण मुले व मुली शिकवणीसाठी आलेले असतात. त्याठिकाणी जवळच दारूचे दुकान असल्याने तेथून दारू पिऊन आलेल्या व्यक्ती त्याच ठिकाणी धिंगाणा घालत बसतात. त्यामुळे या रस्त्याने महिलांना व मुलींना जाणे देखील अवघड होत आहे. या दारुपायी संभाजी नगर परिसरात एखादा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी राजे संभाजीनगर कमान परिसरातील व संपूर्ण संभाजी नगरात अन्य ठिकाणी सुरू असलेली अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात येऊन दारू विकणाऱ्या व्यक्तींनी भविष्यात लगतच्या परिसरात कोठेही दारू विक्री करू नये व दारूबंदी कायम राहावी याकरिता पोलीस प्रशासनाने सुद्धा कोणतीही हयगय करू नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी साहेब, बुलढाणा मा.अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा व मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांना देण्यात आल्या. त्यावेळी विभाग अध्यक्ष शरद कळमकर शाखा अध्यक्ष वैभव देहाडराय, सचिन झगरे, मंगेश तायडे, पंढरी मसुरे, गणेश कळमकर, सुरज फाटे, ज्ञानू सोळंकी, ज्ञानेश्वर इंगळे, अमर काळे पाटील, शुभम भिसे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129