
ग्रामपंचायतींमध्ये भाजपचाच झेंडा, अजितदादांच्या गटाची मुसंडी, मविआला दे धक्का!
MH 28 News Live : रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या वीस हजारपेक्षा अधिक जागांसाठी मतदान झालं. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ग्रामपंचायत निकालांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यातील 103 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.
राज्याील ग्रामपंचयात निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप 103 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालं आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजित पवार गटानं आतापर्यंत 87 ग्रामपंचायतींवर आपला झेंड फडकवला आहे. शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे, शिवसेनेनं 67 ग्रमपंचायतींमधील सत्ता काबीज केली आहे. ठाकरे गट 30, काँग्रेस 38, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आतापर्यंत 32 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर 42 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाडींचा विजय झाला आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पनाला
दरम्यान आज राज्यभरात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याचवेळत निकाल हाती येणार आहेत. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभेची देखील निवडणूक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जनतेचा कौल जाणून घेण्याची ही एक संधी आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे