
सुनील वायाळ यांना स्वातंत्र्यसैनिक सूर्यभान अण्णा पवार सेवा गौरव पुरस्कार प्रदान; ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान
चिखली : अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना ग्रंथालय चळवळीमध्ये उल्लेखनीय योगदान देणारे बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष सुनील वायाळ यांना स्वातंत्र्यसैनिक सूर्यभान अण्णा पवार सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात वायाळ यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
स्वातंत्र्य सैनिक सूर्यभान अण्णा पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ शासनमान्य मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व स्वातंत्र्य सैनिक सूर्यभान पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडास्तरीय ग्रंथालय कार्यशाळा दि. ६ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभान पवार महाविद्यालय येथे संपन्न झाली. मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला उत्तेजना देण्याबाबत चर्चासत्र, परिसंवाद आणि इतर उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. सुनील वायाळ यांनी देखील या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ग्रंथालय चळवळ अधिकाधिक लोकाभिमुख करण्याबद्दलच्या आपल्या सूचना व विचार यावेळी मांडले. यावेळी सार्वजनिक वाचनालय चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सुनील वायाळ यांना मान्यवरांच्या हस्ते हा सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रंथालय चळवळीतील आपल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरावर ख्याती प्राप्त असलेले सुनील वायाळ यांना या पुरस्काराच्या रूपाने आणखी एक सन्मान प्राप्त झाला ही बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button