आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून कृषी क्षेत्रा महत्त्वाची उपलब्धी. तालुक्यातील खोर येथे रेशीम उद्योगासाठीच्या अंडीपूंजी प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता. हजारो शेतकरी होणार आता लखपती
चिखली : आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना व पाठपुरावांना अखेर यश मिळाले असून रेशीम उद्योगाला चालना देणाऱ्या व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या अंडीपूंजी प्रकल्पाला दि. ८ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कृषी प्रक्रिया व रेशीम उद्योगात मोठी क्रांती घडवण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी लखपती होतील असा विश्वास व्यक्त करत याबद्दल आ. श्वेताताई महाले यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
तालुक्यात कृषी प्रक्रिया उद्योग आणि रेशीम उद्योगाला नवी दिशा व नवी गती देणारा हा अंडीपूंजी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहे. एका एकरात एका महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न शेतकऱ्याला मिळवून देण्याचे क्षमता या अंडीपुंजी प्रकल्पामध्ये आहे. याद्वारे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी या संदर्भात व्यक्त केला आहे.
अशी आहे पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती
विद्यमान आमदार श्वेताताई महाले जिल्हा परिषद सदस्य असताना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहकार व वस्त्रोद्योग मंत्री म्हणून सुभाषबापू देशमुख हे कार्यरत होते. त्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले हे चिखली तालुक्यातीलच असल्यामुळे त्यांनी तालुक्यातील खोर येथील मूळ रहिवासी असलेले रेशीम उद्योग उपसंचालक श्री दिलीप हाके यांच्या सहकार्यातून आपल्या तालुक्यात एखादा मोठा प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. याच प्रयत्नातून खोर येथे रेशीम उद्योगासाठी उपयुक्त असलेल्या अंडीपुंजी प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याबद्दलच्या सर्व बाबीची पूर्तता केल्यानंतर राज्य शासनाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला गेला. त्याला मंजुरीही मिळाली. मात्र, खोर येथे पुरेसा रस्ता उपलब्ध नसल्यामुळे व काही भौतिक कारणांमुळे तेव्हा या प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. खेदाची बाब म्हणजे तत्कालीन आमदारांनी देखील त्या उणिवा दूर करण्याचे प्रयत्न न केल्याने सदर अंडीपूंजी प्रकल्प थंड बस्त्यात पडला होता. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारी व आर्थिक अडचणीमुळे हा प्रकल्प पुन्हा रेंगाळला. राज्यात सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि आ. श्वेताताई महाले यांनी एकवार नव्या जोमाने या प्रकल्पासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू केला. या प्रयत्नांना राज्य सरकारकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि राहिलेल्या त्रुट्या पूर्ण करून आ. महाले यांनी या प्रकल्पाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवली.
राज्य सरकारने दिली शेतकऱ्यांना सुवर्णसंधी – आ. महाले
” आपल्या चिखली तालुक्यात हा महत्त्वपूर्ण असलेला अंडीपूंजी प्रकल्प मिळवण्यात यश प्राप्त झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य यासाठी लाभले तसेच वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सुद्धा भूमिका यासाठी महत्त्वाची होती. अंडीपुंजी प्रकल्प आपल्या तालुक्यात येणे ही गोष्ट स्थानिक शेतकरी बांधवांसाठी त्यांचे उत्पादन दुपटीने वाढवणारी आहे हे सांगायला मला आनंद वाटतो. अंडीपूंजी प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही सर्व चिखली तालुकातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादनाला चालना मिळणार असून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरभराटीची ही एक सुवर्णसंधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिली आहे, आता माझ्या शेतकरी बांधवांनी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचे सोन्यात रूपांतर करावे अशी अपेक्षा मी व्यक्त करते ” अशी प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी या संदर्भात व्यक्त केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button