प्रेमापाशात गुरफटलेल्या जिल्ह्यातील १३५ अल्पवयीन मुली ‘ मजनू ‘ नी पळवल्या… ‘ ऑपरेशन मुस्कान’ ‘ द्वारे १४ मुली पोलीसांनी शोधून आणल्या
MH 28 News Live / बुलढाणा : प्रेमापाशात गुरफटलेल्या अल्पवयीन मुलींना लग्नाचे अमिश दाखवून मजनूंनी पळवून नेल्याच्या घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापराने अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मुलींचे कुटुंबीय पोलिसांकडे धाव घेतात, तर अल्पवयीनांसोबतच महिला- पुरुषदेखील बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यातील १३५ अल्पवयीन मुलींना पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांनी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत त्यापैकी ९४ मुलींचा शोध लागला असं त्यांना घरी परत आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
अनेक अल्पवयीन मुलगे, मुली सोशल मीडियाच्या आहारी गेल्या असून, क्षणिक आकर्षणापोटी ते घर सोडून जातात. तिकडे लग्नदेखील करतात. अशा मुला-मुलींना शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारत पोलिसांच्या ‘एएचटीयू’ अर्थात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिसांनी गेल्या ११ महिन्यांत तब्बल ९४ अल्पवयीन मुलींना शोधून काढले. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, अनेक महिलादेखील सुखी संसार सोडून क्षणिक सुखाच्या मोहापायी पळून जातात. काहींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जाते, तसे प्रकारदेखील उघड झाले आहेत. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शून्य ते १८ वर्षांखालील मुला-मुलींना शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. या मोहिमेंतर्गत बेपत्ता झालेल्या मुली आणि मुलांचा शोध घेण्यात येतो. तसेच या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button