♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भाजपची विचारधारा घराघरात पोहचवा – आ. आकाश फुंडकर भाजप स्थापना दिनानिमित्त ६ ते १० एप्रिल पर्यंत “अभिमान – अभियान” राबवण्याचे आवाहन

MH 28 News Live, खामगाव : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस आहे, हा दिवस आठवडाभर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ” अभिमान – अभियान ” हा कार्यक्रम राबवून विविध कार्यक्रमांनी साजरा करावा व भाजपची विचारधारा घराघरात पोहचवा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

संपूर्ण देशात ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आदेशाने महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी सर्व शक्ती केंद्र प्रमुखांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गळ्यात पक्ष दुपट्टा , बिल्ला लावून घरावर भाजप ध्वज फडकावून पक्षाप्रति आदर व्यक्त करावा. तसेच सकाळी ठीक १० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व भाजप परिवारासह देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी ठिकठिकाणी टीव्ही, एलसीडी, प्रोजेक्टर लावून सर्वांसाठी सोय करून मोदीं यांच्या मार्गदसर्शनाचा लाभ घ्यावा, १० एप्रिलपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम राबावावे असे आवाहन आ. फुंडकरांनी केले. तसेच भाजप हे अंत्योदयचा संकल्प देत देशातील गोर गरीब, शोषितव वंचित वर्गाच्या कल्याणकरिता, देशसेवेसाठी सबका साथ, सबका विकास या संकल्पेनेने कार्य करत आहे. भाजपची ही विचारधारा या कार्यक्रमातून भाजप शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख , जि प सदस्य , प स सदस्य, ग्रा प सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडळ अध्यक्ष, जिल्हा व मंडळ पदाधिकारी, सर्व आघाडीचे प्रमुख, पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहनही भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129