♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगावला मुरारका शाळेजवळ अपघातात ट्रॅक्टर चालकाचा  मृत्यू

MH 28 News Live, शेगाव :

शहरातील मुरारका टी पॉईंट जवळ शुक्रवारी रात्री ट्रॅक्टरचा विचित्र अपघात घडला. शहरातून जवळ बु. कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर डिव्हायडर वर जाऊन आदळला यामध्ये ट्रॅक्टर चालक चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आनंद अशोक गवई वय २६ वर्ष असे अपघातातील मृतक चालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शेगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील आनंद अशोक गवई वय २६ वर्ष हा युवक मुरारका शाळेजवळ वळण रस्त्यावर अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली.. ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर डिव्हायडर वर जाऊन आदळला यामध्ये ट्रॅक्टर चालक चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस पोहचून ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. तर मृतक चालकाचे मृतदेह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.. रुग्णालयाकडून रात्री सव्वाअकरा वाजता मिळालेल्या मेमो वरून शेगाव शहर पोलिसात मर्ग दाखल आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129