♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगावात झाला चोरट्यांचा सुळसुळाट. बँगेतून रोख रक्कम पळवण्याच्या घडल्या दोन घटना. एका घटनेत दागिनेही लांबवले

MH 28 News Live, खामगांव : स्थानिक ठेकेदार राजकिरण प्रकाश टिकार (रा. बोरीअडगांव हमु अग्रसेन चौक) यांनी काल २४ मार्च २२ रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव मधून मजूरांना वाटप करण्यासाठी १ लाख रूपये काढले. त्यानंतर पंचायत समितीमध्ये गेले व मजूरीचे पैसे वाटप करण्यासाठी बॅग उघडली असता पैसे दिसून आले नाही. त्यामुळे ते बँकेत परत गेले व हि बाद बँकेच्या व्यवस्थापकांना सांगीतली असता त्यांनी त्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचे आदेश दिले. पाहणी केली असता एक महिला बॅगमधुन पैसे काढत असतांना दिसुन आली. याप्रकरणी राजकिरण टिकार यांनी शहर पो.स्टे. ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

महिलेच्या बॅगमधून रोख व दागीने

खामगांव येथील दुसऱ्या एका घटनेत बुलडाणा येथील रहिवासी रसिका दत्तात्रय भुतेकर या – महिलेच्या बँगेतून रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्याने पळवून नेले.

काल २४ मार्च रोजी शहर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार रसिका भुतेकर ह्या त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आईसोबत खरेदीसाठी शहरात गेल्या होत्या. २४ मार्च २२ रोजी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास त्यांनी जगदंबा चौकातील झी महासेलमध्ये साहित्य खरेदी करण्यासाठी केले. त्यानंतर कॉउंटरवर बिल देण्यासाठी बॅग उघडली असता त्यामध्ये पर्स दिसून आली नाही. पर्समध्ये नगदी १२ हजार, सोन्याचा लक्ष्मीहार (अ.कि.५२.८००) सोन्याची अंगठी (अं.किं. १३.२००रु.) असा एकूण ७८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व इतर महत्वाची कागदपत्रे होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅगमधील पर्स लंपास केली. रसिका भुतेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129