
२०२२ साठी जिल्हात ह्या तीन स्थानिक सुट्ट्या झाल्या जाहीर
MH 28 News Live, बुलडाणा : शासन निर्णय १६ जानेवारी १९५८ व ६ ऑगस्ट १९५८ नुसार विहीत करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याकरीता सन २०२२ या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
त्यामध्ये नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) गुरूवार ११ ऑगस्ट , पोळा शुक्रवार २६ ऑगस्ट व लक्ष्मीपुजनचा दुसरा दिवस मंगळवार, २५ ऑक्टोंबर रोजी असलेल्या सुट्टयांचा समावेश आहे. स्थानिक सुट्टी ही संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याकरीता लागू असणार आहे. मात्र दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागाने कळविले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button