♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पालकमंत्र्यांनी भरली जळगाव जामोद तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना चाबी…. म्हणाले ” तयारीला लागा ! “

MH 28 News Live, जळगांव जामोद : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर कमिटीच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद तालुका आढावा बैठक दि. २० मार्च रोजी संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूकीच्या अनुशंगाने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तालुक्यातील पक्षाच्या कामाचा आढावा पक्ष पदाधिकार्यांमार्फत घेतला. आगामी काळात येणाऱ्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष व्हायला हवा त्यादृष्टीने कामाला लागा असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.

सदर बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ व कार्याध्यक्ष महादेव भालतड़क यांनी ४० लोकांची कार्यकारिणी, १४० लोकांची कायम निमंत्रित जम्बो कार्यकारणी तसेच शहराध्यक्ष अजहर देशमुख व कार्याध्यक्ष संजय ढगे यांनी २५ लोकांची शहर कार्यकारणी घोषित केली. यावेळी दुर्गा चौकामध्ये जळगाव जामोद शहर कार्यालयाचे तसेच तंजीर जमदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रकाश ढोकणे, विश्वनाथ झाडोकार, संगीतराव भोंगळ, रमेश उमाळे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे,जिल्हा सरचिटणीस संदिप उगले,रंगराव देशमुख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद, कार्याध्यक्ष एम.डी.साबीर, महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई वाघ, मनोहर वाघ, डॉ. प्रशांत दाभाड़े, शेख जावेद, हमीद भाई, संजय देशमुख, प्रकाश गावंडे, सुभाष कोकाटे, संजय मारोडे, अरुण निंबोळकार, राजू देशमुख,बाळू डिवरे, अँड. मोहसीन खान, विश्वासराव पाटिल, दिनकरराव दाभाड़े, महादेव वानखड़े, प्रकाश कराळे, दीपक वसतकार, वामनराव गुडेकर, इरफान खान, आशिष वायझोड़े, अब्दुल जहीर, अनूप महाले, अताउल्लाह पठाण, सिद्धार्थ हेलोडे, योगेश घोपे, ऋषिकेश देशमुख यांच्यासह हजारो लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीम खान यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता डिवरे यांनी केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129