♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेहकर – चिखली रोडवर मुंगसरी फाट्याजवळ ट्रकचा भीषण अपघात. १२ जनावरांसह २ व्यक्ती ठार तर १ जण गंभीर

MH 28 News Live, रवींद्र सुरुशे, मेहकर : चिखली – मेहकर रोडवर मुंगसरी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या एम एच ४८ एजी ७८२० ट्रेलरला एम एच २० डी इ ४४६५ या क्रमांकाच्या म्हशीने भरलेल्या आयशर ट्रकने दि. ८ एप्रिलला सकाळी ९ वाजता जोरदार धडक मारली. या अपघातात दोन जण ठार तर एक जबर जखमी झाला.

म्हशींना वाहून नेणार्या आयशर ट्रकने मेहकर कडून चिखलीकडे जात असताना मागून येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भरीव लोखंडी सळया होत्या. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिक वाढली.

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात २ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी झाले. ठार झालेले व्यक्ती औरंगाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात १२ जनवरे ठार झाली तर ४ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. जबर दुखापत झालेल्या व्यक्तींना बुलडाणा येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनांमधील जखमी असलेल्या म्हशींवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर तातडीने पोलिस हजर होऊन पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129