♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बिल्डिंगवरून पाय घसरून पडल्याने देउळगाव राजा येथे मजूराचा मृत्यू

MH 28 News Live, देऊळगाव राजा : बिल्डिंगच्या बांधकामावर मजूरी करीत असलेल्या एका एक 25 वर्षीय मजूराचा पाय घसरून खाली पडल्याने घटनास्थळीचं मृत्यू झाला. ही दुदैवी घटना 12 एप्रिलच्या दुपारी 4 वाजे दरम्यान घडली. या प्रकरणी देउळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक गणेश नगरमध्ये सुरू असलेल्या एका बिल्डींगच्या बांधकामावर पंकज कांता कांबले उर्फ बंटी हा मजूरी करत होता. दरम्यान बिल्डिंगवर काम करीत असताना अचानक संतुलन सुटल्याने पाय घसरून तो बिल्डींगच्या खाली कोसळला. यामध्ये घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129