
लोणारच्या तहसीलदारांनी केली अवैध रेती वाहनावर धडक कारवाई
MH 28 News Live : लोणार : तहसीलदार सैपन नदाफ यांनी अवैध रेती वाहनावर धडक कारवाई केली असून या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चे धाबे दणाणले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर असे की लोणार ते मंठा रोडवर शहराबाहेरील गणपती मंदिरा जवळ मिळलेल्या गोपनीय माहिती वरून तहसीलदार सैपन नदाफ हे आपले सहकारी तलाठी जगन बारबुदे महसूल सहाय्यक पुरुषोत्तम आघाव महसूल मित्र वैभव मांटे यांनी अवैद्य रेती वाहतूक करणारे एम एच २१ बी एच ०९३५ क्रमांकाचे ४०७ वाहन पकडले त्यांच्या कडे कोणताच रेती वाहतुकीचा परवाना मिळून आला नाही चालक योगेश चाटे याला विचारणा केली असता त्याने वाहतूक परवाना नसल्याचे सांगितले या नंतर तहसीलदार सैपन नदाफ यांनी ते वाहन तहसील कार्यालयात च्या आवारात लाउन वृत्त लिहे पर्यंत पंचनामा व कार्यवाही सुरू होती
लोणार शहरातून २ ब्रास ४०७ वाहनाने अवैद्य रेती वाहतूक मोठया प्रमाणात होते परंतु तहसीलदार तपासणी साठी रोड वर येताच त्यांचा लोकेशन साठी ठेवलेलं माणस हे लोकेशन देताच ती वाहने मराठवाडा हदीतच थांबवली जातात.
तहसीलदार यांनी सांगितल्या नुसार अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला द्यावी जेणे करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यापुढे अवैध रेती वाहतूक करणारी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिला



