
शेलगाव देशमुख येथे गॅस सिलेडरचा स्पोट,लाखो रुपायाचे नुकसान
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे 17 एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्पोट झाल्यामुळे तीन घरे आगीत भस्मसात झाली आहे. यामध्ये भीमराव आनंदा आमटे यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले आमटे यांच्या घरातील नगदी 50 हजार रुपये व 1 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, 16 बकऱ्यांचे पिल्ले ,2 मोटारसायकली जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तू सर्व आगीत जळून खाक झाली आहे.
शे कालू शे हबीब यांचे घर सुद्धा आगीत जळून भस्म झाले त्यांचे संसार उपयोगी साहीत्य या आगीत जळून खाक झाले तसेच रघूनाथ खंडारे यांचे सुद्धा घर या आगीत जळून राख झाले भिमराव आमटे यांचे घरातील गॅसचा स्पोट इतका भयानक होता की गस सिलेडसचे टुकडे टुकडे झाले बाजच्या शेतात उडाले
शरद केळे यांचे शेतात सौर उर्जा पंपावरून टॅकर आनून सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद रूप धारण केल्यामूळे मेहकर येथील अग्नीशामक दलाला फोन करून बोलावून आग नियंत्रणात आणण्यास यश आले
यावेळी तहसीलदार संजय गरकल, शैलेश सावजी, राजेंद्र पळसकर, वसंतराव देशमुख ,डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश अपसुंदे व इतर क्रर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी मंडळ अधिकारी चनखोरे ,तलाठी बालाजी तिरके, कोतवाल किशोर पातुरकर, भगवान बघे ग्रामविकास अधिकारी डि .पी काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.



