♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

क्षुल्लक कारणावरून मारहाण दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

MH 28 News Live, देऊळगाव राजा : मित्रासोबत रोडवर बोलत उभे असताना दोन आरोपींनी फिर्यादीस अश्लील शिवीगाळ चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी 24 एप्रिल ला आरोपीविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी गिरीश मोतीराम वाघमारे वय 45 वर्ष राहणार माळीपुरा देऊळगाव राजा हे त्यांच्या मित्रासोबत देऊळगावराजा शहराबाहेरील हॉटेल वीरा समोर मित्रासोबत बोलत उभे असताना तेथे आरोपी क्रमांक एक राजेंद्र अशोक पंडित क्रमांक 2 जनार्दन महादू मगर दोन्ही राहणार माळीपुरा देऊळगाव राजा हे घटनास्थळावर आले आणि फिर्यादीस अश्लील शिवीगाळ तसेच करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची तक्रार फिर्यादी यांनी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला दिली त्यावरून उपरोक्त दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129