पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर कमी करा, भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन, जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर लवकरात लवकर कमी करावे व सामान्य नागरीकांची फसवणूक थांबवावी यासाठी दि. २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत मोठा दिलासा देत पेट्राल ९.५० प्रती लिटर व डिझेल ७.०० प्रतीलिटर तसेच गॅस २००/- नी कमी करून सामान्य नागरीकांना मोठा दिलासा देत केंद्र शासनाने पेट्रोल/डिझेलदर मोठ्या प्रमाणात कमी केल्याने राज्य शासनाने नाईलाजास्तव पेट्रोल दर २.०८ रुपये व डिझेल १.४४ रुपये प्रमाणे दर कमी करून सामान्य नागरीकांच्या तोंडाला पाणे पुसण्याचा केविलवाणा प्रकार केला आहे. या मध्ये राज्य सराकरने कोणत्याही प्रकारचा व्हॅट व टॅक्स कमी न करता फक्त घोषणाबाजी केलेली आहे. राज्य शासनाने केलेली सदर दर कपात ही फक्त सामान्य नागरीकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असुन माहाविकास आघाडी सरकार ही खरच जनहिताचे सरकार असले तर हया राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल वरील जीएसटी व व्हॅट मध्ये कपात करून केंद्र सरकारने दिलेल्या कपात धर्ती वर पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत कपात करून सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. जर माविआ सरकार दारुवरील कर कपात ५० टक्के करु शकते तर पेट्रोल व डिझेलच्या करात कपात का करीत नाहीत ? असा प्रश्न निर्माण भाजपा युवा मोर्चातर्फे उपस्थित करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करून दाखविले आता राज्य सरकार कपात कधी करणार अशी विचारणा भारतीय जनता युवा मोर्चा बुलडाणा वतीने करण्यात येत आहे.
केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने सुध्दा पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये कपात न केल्यास भा. ज. यु. मो. च्या वतीने उग्र यल्गार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला.
या वेळी युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख पद्मनाभ बाहेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायक भाग्यवंत, तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, तालुका संपर्कप्रमुख सोपान जगताप, तालुका सरचिटणीस सतिश पाटील, यश तायडे व अमोल पडोळ, तालुका उपाध्यक्ष प्रविण गाडेकर व अमोल जाधव, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अभिषेक वायकोस, भाजपा नेते अरविंद होंडे, वैभव इंगळे, अनंता शिंदे, नितीन बेंडवाल, वैभव जोशी, भाजपा युवा मोर्चा बुलडाणा शहर प्रमुख सोहम झाल्टे, शहर सरचिटणीस मोहित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button