♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांची यादी प्रसिद्ध. अधिकृत संस्थेतच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

MH 28 News Live, बुलडाणा : जिल्ह्यातील टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शासनाकडून मान्यता देण्यात येते. तसेच सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत त्याच जिल्ह्यात घेतल्या जातात. प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे ई-प्रमाणपत्र आहे किंवा नाही याची खात्री करूनच विद्यार्थ्यांनी सदर संस्थेत प्रवेश घ्यावा. जिल्ह्यात अशा अधिकृत मान्यता प्राप्त संस्थोची यादी mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही अवैधरित्या प्रवेश देऊन पालकांची व विद्यार्थ्यांची संस्थेकडून दिशाभूल केल्या जात असल्याची बाब मान्यता प्राप्त संस्था चालकांच्या संघटनेने निदर्शनास आणली आहे. जिल्ह्यात अनधिकृत संस्था आढळल्यास त्यांच्या विरूद्ध शासन नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

**********
.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129