♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सरपंचांच्या पुढाकारातून अखेर डोणगांवात झाल्या घंटागाडया सुरू

MH 28 News Live, डोणगांव : डोणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रेखाताई रवी पांडव यांच्या पुढाकारातून डोणगाव गावाच्या बंद असलेल्या घंटागाडया, साफसफाई कामे ही स्वतः पुढाकार घेऊन दि. ४ जुलै पासून सुरू करण्यात आली आहेत.

डोणगावमधील घंटागाडया, स्वच्छता या सुविधा ग्रामपंचायतने काही काळापूर्वी जाणून बुजून बंद केलेल्या नव्हत्या. त्यासाठी गावाने निवडून दिलेले ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी विरोधी गट यांनी खर्च करण्यात मज्जाव केल्याने व सरपंच यांचे नावे खाते बदल होऊ न दिल्याने ही परिस्थिती गावात उद्भवली, गावाची प्रथम नागरिक सरपंच असल्याने गावाच्या आरोग्याची काळजी घेणे आद्य कर्तव्य आहे.. तरी ग्रामपंचायती तर्फे गावकऱ्यांच्या झालेल्या गैरसोरीबद्दल सरपंच यांनी सर्वांची क्षमा मागत गावकर्यानी हीमोठ्या मनाने मुलगी, बहीण समजून माफ सुद्धा करावे असे आवाहन सरपंच रेखाताई पांडव यांनी यावेळी बोलताना केले.

गावाची प्रत्येक समस्या ही सरपंच याचीसमस्या असे समजून खरे कारण लोकांसमोर यावे यासाठी म्हणून गावकऱ्यांची गैरसोय झाली तरी आपण मला समजून घ्यावे. तसेच आंदोलनकर्त्यांनी उठवलेल्या आवाजाबद्दल त्यांचे विशेष आभार मानून भावनिक आवाहन करत सरपंचांनी दि. 4 जुलै ला सर्व घंटागाडया, स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार केला. गावातील स्वच्छतेची सर्व कामे येत्या आठ दिवसात पूर्व पदावर येतील याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संजय निवृत्ती जमदाडे, संदीप टाले, रमेश काळे, प्रकाश बाजड, हमीद कुरेशी हजर होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129