डॉ. विशाल इंगोले यांची कविता अमरावती विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट
MH 28 News Live, लोणार : येथील प्रसिद्ध कवी डॉ. विशाल इंगोले यांची “अतिक्रमण” ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. डॉ विशाल इंगोले यांचा “माझ्या हयातीचा दाखला” हा कविता संग्रह साहित्य क्षेत्रात दाखल झाला. त्यानंतर काव्य क्षेत्रासह त्याची सर्वच स्तरातून सन्मानाने दखल घेतल्या गेली. ह्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांना मानाचे तीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत समीक्षकांनी त्यांच्या कविता संग्रहाची सकारात्मक समीक्षा केली आहे. किन्ही व लोणार सारख्या ग्रामीण भागातून त्यांची कविता फुलून येत थेट राज्य शासनाच्या “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या” सदस्य पदापर्यंत त्यांना घेऊन गेली हे खरे कवितेचेच देणे आहे. त्यातच डॉ. विशाल इंगोले ह्यांची कविता आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. च्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. यातून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. ह्याबद्दल कवी डॉ. विशाल इंगोले ह्यांचे साहित्य, शैक्षणिक तथा इतर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. नव्हेतर काव्य प्रांतातील पुढील भव्य वाटचालीसाठी शुभेच्छाही प्राप्त होत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button