♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हे काम नसेल केले तर लगेच करा नाहीतर तुमचे आधार कार्ड होईल रद्द !

MH 28 News Live : दहा वर्षे पूर्ण झालेले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी करुन दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. असे आधारकार्ड अपडेट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने रहिवासी पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधारकार्ड नोंदणी झालेले असते. आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने यासर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, त्यांनी आपल्या नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जावून कागदपत्रे सादर करावी. आधारकार्ड अपडेट केले नसल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कागदपत्रे अद्यावत करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129