लोणार शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपोषण
MH 28 News Live, लोणार : शहरातील अनेक वर्षांपासून ची पाणी प्रश्न समस्या असल्याने यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव माजी नगरसेवक शाम राऊत युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात २९ मे २०२३ ला दुपारी ३ वाजता आमरण उपोषण सुरवात केली.
यामध्ये त्यांनी लोणार शहराला प्रत्येक वार्डाला चौथ्या दिवशी सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे. या सर्व बाबींची नगरपरिषदेकडून त्वरित दखल घेऊन लोणारची पाणी समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केलेली आहे.
या वेळी शहर प्रमुख गजानन जाधव माजी नगरसेवक शाम राऊत, प्रकाश सानप, तालुका संघटक कैलास अंभोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, शहर उप प्रमुख लुकमान कुरेशी, सुदन अंभोरे, इकबाल कुरेशी, तानाजी मापारी, पवन नेवरे विठल जाधव, रवी जाधव, रामा जावळे, संजय जाधव, फकिरा डेंगले, राजू बुधवत, प्रवीण सरदार, शंकर भांदुर्गे, रवी भांदुर्गे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button