♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रकाश महाजन यांनी गाजवले रायपूरचे सभा मैदान… कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंज्याच उचलायचा का ? एक वेळ बंडू सारख्या गरीबाच्या पोराला संधी देऊन बघा…

MH 28 News Live / चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमच्या चिखली मतदार संघात बंडू बरबडे सारखा जो उमेदवार दिला तो तुमच्या मतदार संघाचा विकास करेल याची त्यांना शंभर टक्के खात्री होती. आमदारकीची निवडणूक म्हटल्यावर श्रीमंताच्या घरातील, राजकीय वारसा लाभलेल्या मंडळींनीच निवडणुका लढायच्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी का फक्त आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का ? असा सवाल मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिखली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गणेश उर्फ बंडू श्रीराम बरबडे यांच्या प्रचारार्थ दि. ७ नोव्हेंबर रोजी ग्राम रायपूर येथे महाजन यांची सभा आयोजित करण्यात आली या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ढोल ताशांच्या गजरात महाजन यांचे स्वागत रायपूर येथील गावकऱ्यांनी केले. त्यानंतर छत्रपती शिवराय, हिंदूसूर्य महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली सभेला संबंधित करताना महाजन यांनी सांगितले की, बंडू बरबडे याने शाखाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष पर्यंतचा प्रवास करताना मनसेने ना कधी जात बघितली ना कधी पैसा आहे. मात्र त्या माणसाचं काम बघून त्या माणसाची काम करण्याची जिद्द पाहून त्या व्यक्तीला मनसेने उमेदवारी दिली आहे जातीपातीच्या या गलिच्छ राजकारणात संपूर्ण महाराष्ट्राला राज ठाकरे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मनसेच्या गणेश उर्फ बंडू बरबडे याला रेल्वे इंजिन या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन ग्रामस्थांना केले.

यावेळी मनसेचे जालना जिल्हा अध्यक्ष गजानन गीते, चिखली विधानसभेचे उमेदवार गणेश बरबडे, जिल्हा सचिव डॉ योगेश काळे, चिखली तालुकाध्यक्ष विनोद खरपास,शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे, शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अरुण येवले, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उप तालुकाध्यक्ष अविनाश सुरडकर, मयूर पऱ्हाड, सागर इंगळे यांसह सर्व विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129