♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तरुणाच्या टोकाच्या निर्णयाने नांदुरा हादरले; धावत्या मालगाडी समोर उडी मारून संपवले आयुष्य

MH 28 News Live / नांदुरा :सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस जगण्याचा खरा अर्थ विसरून बसला की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. देशभरासह महाराष्ट्रात अनेक तरुण-तरुणी आत्महत्येचा मार्ग निवडत असल्याच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाढत असताना, बुलढाण्यातील नांदुरा येथे घडलेली घटना मनाला चटका लावणारी ठरली आहे.

मंगेश श्रीराम बुरुकले (वय २७, रा. अंबादेवी गडाच्या मागे, नांदुरा) या तरुणाने ६ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास मालगाडीसमोर उडी घेत आयुष्याचा शेवट केला. नवीन बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या लोहमार्गावर, मालधक्क्याजवळ हा हृदयद्रावक प्रकार घडला. त्या मार्गावरून वेगाने जात असलेल्या मालगाडीच्या लोकोपायलटला तरुण आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. गाडीचा वेग जास्त असल्याने ती थांबविणे शक्य झाले नाही आणि गाडीच्या धडकेने मंगेश लोहमार्गाच्या बाहेर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती लोकोपायलटने तातडीने नांदुरा रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात पार पडले.

मंगेशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे आई आणि मोठा भाऊ असा परिवार उरला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने पुन्हा एकदा समाजाला प्रश्न केला आहे. स्पर्धेच्या आणि तणावाच्या या जगात आपण माणसाला जिवंत ठेवणारे आधार आणि आशा देण्यात कमी तर पडत नाही ना ?

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129