♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रॉकेल ओतून पेटलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

MH 28 News Live / अमडापूर : चिखली तालुक्यातील अमरापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरखेड या गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातच स्वतःवर रॉकेल ओतून पेट घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन दत्तात्रय धोंडगे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास नितीनने स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने त्याला तत्काळ बुलडाणा येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश येत अखेर १२ सप्टेंबर रोजी रात्री ९.४४ वाजता त्याने प्राण सोडले.

या दुःखद घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129