♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बारावीच्या परीक्षेसाठी निघालेला विद्यार्थी अपघातात ठार

MH 28 News Live / चिखली : मालगणी फाटा (चिखली–बुलढाणा रोड) येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शंतनू नारायण अंभोरे (वय २१, रा. एकलारा ता. चिखली) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू अंभोरे हे आज सकाळी एकलारा येथून परीक्षा देण्यासाठी बुलढाणा येथे दुचाकीने जात होते. मालगणी फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकने दुचाकीला चिरडल्याने शंतनू यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129