♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भीषण रस्ते अपघातात एका युवकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, जामदार कुटुंबावर शोककळा

MH 28 News Live / चिखली : अंढेरा फाटा–जालना रोडवर आज दुपारी सुमारे १२.३० वाजता झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. लग्न समारंभासाठी बुलेटवरून अंबड (जि. जालना) येथे निघालेल्या तिघा तरुणांचा आनंदाचा प्रवास एका क्षणात दुःखद शेवटाकडे वळला. या अपघातात ओम जमदार (वय २०, रा. चिखली) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यासोबत असलेले जय जमदार आणि अभी भवर (दोघेही वय २०, रा. चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अंढेरा फाटा परिसरात बुलेटचा वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली. या धडकेत अपघात अत्यंत भीषण झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. जखमींवर चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करत असून, लग्नाच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129