♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कर्जमाफी कागदावरच, पीककर्जासाठी शेतकरी बँकांच्या दारात

MH 28 News Live / डोणगाव : राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अंमलबजावणी केल्याचा दावा केला जात असला, तरी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची नवीन पीककर्जासाठी सुरू असलेली परवड थांबण्याचे नाव घेत नाही. कर्जमाफी होऊनही बँकांकडून जुन्या कर्जाचा ‘निल’ दाखला मिळत नसल्याने अनेक शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित आहेत. बँकांच्या लालफितीच्या कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीच्या मशागतीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे शासन आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज वितरित करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जावेद खान ठेकेदार यांनी केली आहे.

कर्जमाफीचा लाभ, तरी बँकांच्या चकरा!

शासनाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जमुक्तीचा ‘निल’ दाखला मिळवण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. ‘पोर्टलवर नाव अपडेट झालेले नाही’, ‘तांत्रिक अडचणी आहेत’, ‘वरिष्ठांचे आदेश आलेले नाहीत’, अशी कारणे पुढे करून शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवले जात असल्याची तक्रार आहे. जुन्या कर्जाचा निल दाखला मिळत नसल्याने नवीन पीककर्ज मिळवण्याचा मार्गही अडत आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा घेता येत नसल्याचे चित्र डोणगाव परिसरात दिसून येत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129