
बोलेरो आणि मालवाहू ट्रकच्या अपघातात पाच भाविक जागेवरच ठार तर सात जण गंभीर जखमी
MH 28 News Live, देऊळगाव राजा : रोहनवाडी तालुका जिल्हा जालना येथील भाविकांच्या बुलेरो गाडी आणि ट्रक अपघातात पाच भाविक जागेवर ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १४ मार्च सकाळी साडेपाच दरम्यान शहराबाहेरील वळण रस्त्यावर होटेल विरा जवळ घडली.
सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील एकूण बारा भाविक त्यांच्या बुलेरो गाडी क्रमांक एम .एच. २८ v.44 21 ने एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात असल्याची माहिती मिळते. शहराबाहेरील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक एम. एच. १६ Q १६८२ ला बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. बुलेरो गाडीत असलेले पाच भाविक जागेवर ठार झाले मृतांमध्ये अर्जुन जयवंतराव पाडमुख वय ६० वर्ष क्रमांक २ सौ कांताबाई अर्जुन पाडमुख वय ५५ वर्ष क्रमांक 3 श्रीमंत अर्जुन पाडमुख वय ४५ वर्ष हे तिघेही राहणार रोहन वाडी तालुका जिल्हा जालना, तर कपिल अर्जुन गायकवाड वय ३२ वर्ष राहणार देवडे हातगाव, आणि गाडीचा चालक आकाश गरीबदास येणार वय सत्तावीस वर्ष राहणार कारखेडा तालुका अंबड जिल्हा जालना यांचा जागेवरच मृत्यू झाला आणि सात जण गंभीर जखमी मध्ये आम्रपाली विठ्ठल पाडमुख वय ३५ वर्ष राहणार रोहनवाडी क्रमांक २ मिनाबाई श्रीमंत पाडमुख वय ३५ वर्षे राहणार रोहनवाडी क्रमांक तीन अशोक गरीबदास लिहणार वय २६ वर्ष राहणार रोहनवाडी क्रमांक चार मीराबाई परमेश्वर बाळराज वय ४० वर्ष राहणार रोहनवाडी क्रमांक पाच तुकाराम बाबुराव खांडेभराड वय ४० वर्ष राहणार रोहनवाडी क्रमांक ६ बाबुराव श्रीपत कापसे वय पन्नास वर्ष राहणार रोहनवाडी क्रमांक ७ परमेश्वर कचरू बाबा वय ३९ वर्ष राहणार रोहनवाडी इत्यादी गंभीर जखमी झाले झाले.
घटनास्थळावरून आरोग्यसेवेच्या १०८ वर कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी ॲम्बुलन्स सह डॉक्टर अक्षय गुट्टे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन ॲम्बुलन्स चालक संदीप बुधवत आणि हनुमान जायभाये गंभीर जखमींना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर सुभाष शिंगणे आणि डॉक्टर पूजा डोंगरे यांनी त्यांच्यावर इलाज करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविले त्यासोबतच पोलीस पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला अपघातच एवढा भीषण होता की त्यामध्ये मृत व्यक्तींचे मृतदेह फसलेल्या अवस्थेत असताना ग्रामीण रुग्णालय कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शहादेव डीघोळे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चालक आकाश लिहणार याचे विरुद्ध ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या ट्रकला धडक देऊन स्वतःसह एकूण पाच जणांचा मृत्यू तसेच सात जणांच्या जखमी झाल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



