♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कागदी कपांतून चहा पिणे आरोग्याला घातक; बीपीए रसायनामुळे कॅन्सरचा वाढतोय धोका

MH 28 News Live : शहरातील हजारो चहा टपऱ्यांवर दररोज कागदी कपांमध्ये दिला जाणारा गरम चहा नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो आहे. प्लास्टिक कपांवर बंदी आल्याने पर्याय म्हणून कागदी कप वापरले जात असले तरी, त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बीपीए (बिस्फेनॉल ए) या रसायनामुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे कागदी कप अधिक टिकाऊ बनवण्यासाठी आणि पाण्याच्या संपर्कातही टिकवण्यासाठी बीपीएचे कोटिंग केले जाते. राष्ट्रीय पर्यावरण आरोग्य विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, बीपीए हे पॉलीकार्बोनेट प्लास्टिक व इपॉक्सी रेजिन्स तयार करताना वापरले जाणारे हानिकारक रसायन आहे. गरम पेय कपामध्ये दिल्यास, बीपीए थेट चहात मिसळून शरीरात प्रवेश करते आणि त्याचे परिणाम अत्यंत घातक ठरतात.

काय धोका आहे कागदी कपापासून ?

या कपांच्या वापरामुळे फक्त बीपीएच नाही तर इतर फॅथलेट्स व पेट्रोलियम-आधारित रसायनांचाही धोका वाढतो आहे. यामुळे दीर्घकाळ चहा सेवन करणाऱ्या नागरिकांमध्ये कॅन्सरसह इतर गंभीर आजार उद्भवण्याचा धोका वाढत चालला आहे.

काय आहे तज्ञांचा सल्ला !

आरोग्य तज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांचा सल्ला आहे की, कागदी कपांऐवजी काचेचे, स्टीलचे किंवा पुनर्वापरयोग्य इको-फ्रेंडली कपांचा वापर करावा. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुरक्षित राहील. आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या कागदी कपांचा वापर रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी आणि नागरिकांनीही पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याची गरज आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129