♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली अर्बन बँकेच्या वतीने महिला बचतगटांना १८ लाख ८० हजार रुपये कर्जपुरवठा

MH 28 News Live, चिखली : संतनगरी शेगाव येथे चिखली अर्बन बँक शाखा शेगाव यांच्या वतीने महिला बचत गटाच्या एकूण ५२ महिला सभासदांना रुपये १८ लाख ८० हजारांचे वाटप बँकेचे अध्यक्ष व बचतगटाचे संस्थापक अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते करण्यात आले.

भविष्यात समूहगटांना अधिक कर्जपुरवठा करण्यात येईल व त्याबाबतचे प्रशिक्षण व माहिती वेळोवेळी बचतगटांना दिली जाईल. जास्तीत जास्त महिला सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा व योजनेची व्याप्ती वाढवावी. कर्जवाटप करताना कर्जदाराचे कागदपत्रे तपासून घेऊन त्याचा व्यवहार तपासून घ्यावा लागतो आणि त्याच्याकडून कर्जभरणा करून घेताना मोठा त्रास बँकेला होतो प्रसंगी गहान दिलेली मालमतेचा लिलाव देखील करावा लागतो. परंतु महिला बचतगटांना दिलेल्या कर्जाची नियमित परतफेड होते आणि घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा वापर देखील त्या योग्य ठिकाणी करतात. त्यामुळे बँकेचे महिला बचतगट हे अत्यंत प्रामाणिक कर्जदार असल्याचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बँकेचे शाखाधिकारी सुनील देशमुख यांनी प्रास्ताविक व बचतगटाविषयी माहिती दिली. तसेच पसायदानाने प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129