♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीतील तरुणी रातोरात घरातून झाली बेपत्ता

MH 28 News Live, चिखली : स्थानिक गजानन नगर परिसरातील २० वर्षीय तरुणी रात्री घरात झोपली असताना कुणालाही न सांगता अकस्मात घरातून निघून गेल्याची घटना दि. १० एप्रिल रोजी घडली.

याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, दिनांक १० एप्रिल रोजी सदर तरुणी आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेली होती. तिच्या आईला पहाटे पाच वाजता जाग आली असता मुलगी दिसून आली नाही. तिचा घरात व आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही, तिचा नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला असता चौकशी केली असता मिळून आली नाही. तोंडी रिपोर्ट वरुन तरुणी हरवल्याची तक्रार दाखल करून चिखली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129