♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध : आ. कुटे

MH 28 News Live, जळगाव जामोद : मतदारसंघातील जनतेला नेहमीच विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी तत्पर असून, प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन आ. डॉ. संजय कुटे यांनी केले. भाजपाचे राज्यात राज्य आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. सत्तांतरामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सत्ता स्थापनेच्या
दीर्घकाळानंतर कुटे यांचे मतदारसंघांमध्ये आगमन होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या प्रसंगी आ. कुटे बोलत होते.

मतदार संघात आल्याननंतर आ. डॉ. संजय कुटे त्यांनी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे प्रणेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतीमेचे पुजन करून हार अर्पण केला. मतदार संघातील नैसर्गिक आपदांचा आढावा घेतला. या वेळेत मतदार संघातील ज्या परिवारांवर नैसर्गिक आपत्तींचा डोंगर कोसळला त्या परिवारांची भेट घेतली. त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आले आहे. काहींना शासनाकडून मदतही मिळवून देण्यात आली आहे. आसलगाव येथील मयत जवान राहुल मुळे यांच्या परीवाराला भेट देऊन आ. कुटे यांनी त्यांचे सांत्वन केले. आडोळ येथिल पंजाबराव उगले यांना भेट दिली. निंभोरा येथिल सागर दिघडे हा युवक अचानक वीज पडून मरण पावल्याने त्यांच्याही परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129