♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने 16 वर्षीय युवकाचा मृत्यू

MH 28 News Live : दुचाकीने रसवंतीवर ऊसाचा रस घेण्यासाठी जाणाऱ्या दोन मिंत्राचा रसवंती नजीकच काल दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 5:00 वाजता दरम्यान दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली.

दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच जोराने पडल्या गेले. या अपघातात राहुल शिंगणे वय 16 व रितिक खाडे वय 16 या दोघांना गंभीर मार लागला होता. त्यांच्यावर देऊळगांवमही रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी जालना व औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. परंतु राहुल शिंगणे याच्यावर दिपक हाऊस्पिटल येथे उपचार सुरु असतांना काल सायंकाळी 7:30 वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर रितिक खाडे याची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढत असून उन्हामुळे अनेक जण लाहीलाही होत आहे. अशाताच राहुल शिंगणे व रितिक खाडे या दोन्ही मित्राने रसवंतीवर जाऊन रस पिण्याचा बेत आखला होता. मात्र रस घेण्या अगोदरच काही अंतरावर काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने या दुरर्दैवी घटनेत राहुल शिंगणेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रितिक खाडेची प्रकृती देखील चिंताजनक आहे.सध्या त्याच्यावर औरंगाबाद येथील अपेक्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे.राहुल राजेंद्र शिंगणे हा श्री. शिवाजी विद्यालय देऊळगांवमही या शाळेचा विद्यार्थी आहे.सध्या त्याची वर्ग 9 वी परीक्षा सुरु होती.राहुल हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता.अचानक घडलेल्या दुचाकीच्या अपघातात राहुल शिंगणेच्या मृत्यूच्या घटनेने व रितिक खाडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने देऊळगांव मही परिसरात शोककळा पसरली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129